सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून महाळुंगे पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पोलीस पाटलांनी वाढदिवस केला जल्लोषात साजरा

पुणे-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाळुंगे पोलीस चौकीत सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महाळुंगे पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांचा वाढदिवस पोलीस पाटलांनी जल्लोषात साजरा केलाय.वाढदिवस साजरा  करताना पोलीस पाटलांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करण्यात आलीय.या पोलीस पाटलांनी या अधिकाऱ्याला केक भरवून जल्लोषात वाढदिवस साजरा केला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाळुंगे पोलीस चौकी मध्ये कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस पाटलांनी जमावबंदीचा आदेश धुडकावून व केक कापताना तोंडावर मास्क  घातला नसल्याचा शहाणपणा करून केक कापण्याचा प्रकार केला आहे.यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची जास्त शक्यता आहे.

हा वाढदिवस साजरा केला यावेळी वासुली गावचे पोलीस पाटील खेड तालुका कार्याध्यक्ष अमोल पाचपुते,महाळुंगे गावचे पोलीस पाटील खेड तालुका सरचिटणीस सचिन भोपे,निघोजे गावचे पोलीस पाटील राहुल फडके,भांबोली गावचे पोलीस पाटील दीपक राऊत,सावरदरी गावचे पोलीस पाटील राहुल साकोरे इत्यादी सर्व उपस्थित होते.

खेड तालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील गर्दी जमवत असतील, तर मग सामान्य माणसावर दाखल झालेल्या जमावबंदीच्या गुन्ह्याचं काय? असाही प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.कोरोनाचा समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा पुणे मुंबईसह आता ग्रामीण भागात संसर्ग वाढुन रुग्नांच्या संख्येत भर पडत असताना संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कोणाच्याही तोंडाला मास्क नाही तसेच सोशल डिस्टंसिंग नाही.

दरम्यान, राज्य सरकार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची जास्त शक्यता आहे.त्यामुळे संबंधित महाळुंगे पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकसह व पोलीस पाटलांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

Previous articleनारायणगाव वारूळवाडी परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यामुळे सर्व व्यवहार बंद ;विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – स.पो.निरीक्षक अर्जुन घोडे पाटील
Next articleस्थानिक प्रशासन व ग्रामस्थांची साथ,भोसे गावची कोरोनावर मात तरीही काळजी घ्यावी-पोलीस पाटील सुनिल ओव्हाळ पाटील