बकोरीच्या डोंगरावर निसर्गप्रेमी तरुणांकडून पक्षी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था

Ad 1

वाघोली-बकोरी (ता. हवेली) येथील डोंगरावर जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून माहिती सेवा समिती व तरुणांच्या माध्यमातून डोंगरावर पक्षांना,पाणी पिण्यासाठी झाडखाली पाण्याचे टप ठेवण्यात आले .हे टप दर आठवड्याला भरण्याची जबाबदारी दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानचे धनराज वारघडे यांनी घेतली आहे .तर पाण्याचे टप शिवसमर्थ प्रतिष्ठान वाघोली यांचे माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

यावेळी शिवसमर्थ प्रतिष्ठानचे गणेश जाधव,प्रकाश नागरवाड,चैतन्य पवार माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे,धनराज वारघडे, पोलीस काॅनस्टेबल विकास बांगर हे उपस्थित होते.

ऊन्हाळा सुरु झाला असून प्रत्येक नागरीकांनी आप आपल्या घरासमोर मुठभर धान्य व एक पाण्याचा कटोरा ठेवण्याचे आव्हान यावेळी चंद्रकांत वारघडे यांनी केले .