अॕड.पल्लवी रेगे यांना “स्त्री अस्मिता सन्मान” पुरस्काराने सन्मानित

वाघोली (ता:हवेली) येथील संतुलन संस्थेच्या माध्यमातून भरीव कामगिरी करणार अॕड. पल्लवी रेगे यांना खराडी येथील ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून महिला दिनाचे औचित्य साधून ” स्त्री अस्मिता सन्मान पुरस्कार” देउन सन्मानित करण्यात आले आहे.

 संतुलन संस्थेच्या अॕड.पल्लवी रेगे  गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे समाजाची सेवा करत आहेत.सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान तसेच महिला सबलीकरणासाठी भरिव असे  काम त्यांनी केली आहे.  महिलासाठी मोठा प्रमाणावर बचत गट देखील स्थापन केले आहे.वाघोली परिसरातील दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी संतुलन पाषाण सारखी निवाशी शाळा देखील चालवतात.

 कामगार हक्क, पर्यावरण, बालमजुरी, बालविवाह यांसारख्या वैविध्यपूर्ण सामाजिक क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सुंरेंद्र पठारे फाउंडेशन कडून सन्मानित करण्यात येत आहे.यामध्ये संतुलन संस्थेच्या अॕड.पल्लवी रेगे यांच्या कार्याची आम्ही माहिती घेतली त्यांचे कार्य हे या पुरस्कारा पेक्षा ही शब्दांत मांडण्यात पेक्षा किती तरी मोठे असल्याचे फांउडेशनचे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.यावेळी फांउडेशनचे सुरेंद्र पठारे,पल्लवी रेगे,बस्तू रेगे,पत्रकार सचिन धुमाळ, सुरेश वांढेकर, निर्मला धुमाळ,सुरेश पवार महिला बचत गटांच्या अध्यक्षा व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleअप्पर तहसीलदार हवेली कार्यालयासाठी स्वतंत्र आधिकारी व कर्मचाऱ्यांची आमदार अशोक पवार यांची मागणी
Next articleबकोरीच्या डोंगरावर निसर्गप्रेमी तरुणांकडून पक्षी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था