मंचर भीमाशंकर रोडवर तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

प्रमोद दांगट निरगुडसर

मंचर भीमाशंकर रोडवर शिंदेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बेल्हरेवस्ती येथे झालेल्या तिहेरी अपघातात तिघेजण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान एक जण मृत्यु झाल्याची घटना ( दि.२४)रोजी घडली आहे.या बाबत राजेंद्र सिताराम कोकणे यांनी दि.१ रोजी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की दि. २४ रोजी मंचर ते भिमाशंकर रोडवर अनिल कौदरे गुरव (रा. भीमाशंकर ता. खेड जिल्हा पुणे ) यांनी त्याच्या ताब्यातील क्लोजर गाडी एम.एच.१४ एफ.जी.२८५७ भरधाव वेगाने चालवत असताना भीमाशंकर ,मंचर रोडवर शिंदेवाडी गावच्या हद्दीत बेल्हवरेवस्ती येथे वळणावरील पुलाच्या अलीकडे रस्त्यावरून जाणारे हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल एम.एच.१२ जे.पी.४०५८ हिला पाठीमागून धडक दिली त्यानंतर क्रूजर गाडी रॉंग साईड ला जाऊन भीमाशंकर बाजूकडून घोडेगावला बाजूकडे जाणारी ऍक्टिवा मोटर सायकल एम.एच.१४ एच. पी.6360 या गाडीला समोरुन जाऊन धडकली तसेच फिर्यादी राजेंद्र कोकणे यांची मारुती सुजुकी ईको गाडी एम. एच.47 ए.यु. ९३९५ हिला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील चालक मंगेश सदानंद मांडळी ( वय वर्षे 28 रा. लोहगाव ता. हवेली जिल्हा पुणे ) तसेच दुसऱ्या मोटरसायकलवरील चालक कुशाबा गंगाराम कोरडे वय ५२ रा. फलकेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे ) व मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले रामदास धावजी काळे रा.आमोंडी ता.आंबेगाव हे गंभीर जखमी झाले होते.त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान यातील कुशाबा गंगाराम कोरडे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला अनिल कौदरे हा अपघात करून पळून गेला असून याबाबतची फिर्याद राजेंद्र सिताराम कोकणे कोकणे चिंचोली ( ता.आंबेगाव जि. पुणे ) यांनी दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहे.

Previous articleविशेष पोलीस अधिकारी म्हणून हप्तावसुली करणाऱ्या हरीश कानसकरचे ओळखपत्र रद्द
Next articleसरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल