विशेष पोलीस अधिकारी म्हणून हप्तावसुली करणाऱ्या हरीश कानसकरचे ओळखपत्र रद्द

प्रमोद दांगट, निरगुडसर

रांजणी (ता. आंबेगाव) येथील हरिश महादु कानसकर याने काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासन यांच्याकडे अर्ज करून मिळविलेले विशेष पोलीस अधिकारी ओळखपत्र पोलिसांनी रद्द केले आहे.कानसकर विरुद्ध हप्ता वसुलीच्या व इतर तक्रारी आल्याने हे ओळखपत्र रद्द करण्यात आले आहे.

स्वयंघोषित हरिश महादू कानसकर यांनी पुणे ग्रामीण कार्यालय यांच्याकडे विशेष पोलीस अधिकारी ओळखपत्र मिळण्याबाबतचा विनंती अर्ज केरत विशेष पोलीस अधिकारी हे ओळखपत्र मिळवले होते. परंतु कानसकर यांनी ओळखपत्राचा गैरवापर करून लोकांकडून हप्ते वसूल करत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच कानसकर यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात खंडणी ,मारहाण, धमकी ,दारू विक्री चे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने हे ओळखपत्र रद्द करण्यात आले आहे. कानसकर याने या ओळखपत्राच्या आधारे कुणाची फसवणूक अथवा खंडणी वसूल केली असेल, तर त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी केले आहे.

Previous articleदावडी गावातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याची सरपंच स़ंभाजी घारे यांची मागणी
Next articleमंचर भीमाशंकर रोडवर तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू