दावडी गावातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याची सरपंच स़ंभाजी घारे यांची मागणी

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी गावाला वायरमन नसल्याने वारंवार तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे आदी प्रकार घडत आहेत. परिणामी शेती पिकांना पाणी देता येत नाही. ही बाब विचारात घेऊन ट्रान्सफॉर्मर बदलण्याबरोबरच वायरमन नेमण्याची मागणी सरपंच संभाजी घारे यांनी महावितरणकडे  केली आहे.

दावडी गावाची लोकसंख्या दहा हजाराहून अधिक आहे. पिरखिंड, आमराळवाडी, डुंबरेवस्ती, सातपुते वस्ती या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी केली आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शेती पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत असून, वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने यात अडथळा निर्माण होत आहे.

या वेळी सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, माजी उपसरपंच हिरामण खेसे, प्रसाद डुंबरे पाटील, भगवान बढे आदी उपस्थित होते.

Previous articleकडूस गावातील विविध अडचणी सोडविण्याची ग्रामस्थांची ग्रामपंचायतकडे मागणी
Next articleविशेष पोलीस अधिकारी म्हणून हप्तावसुली करणाऱ्या हरीश कानसकरचे ओळखपत्र रद्द