कडूस गावातील विविध अडचणी सोडविण्याची ग्रामस्थांची ग्रामपंचायतकडे मागणी

राजगुरूनगर-कडूस ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापन, स्वच्छता व सुशोभीकरण तसेच पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या साठवणुकी बाबत व इतर अडचणी बाबत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांना ग्रामस्थांच्या वतीने प्रताप बाळासाहेब ढमाले व ग्रामस्थ यांनी निवेदन दिले.

यावेळी प्रतापदादा ढमाले यांच्यासमवेत मुरलीशेठ पानमंद, बाळासाहेब बोंबले, संदीप धायबर, मारुतीतात्या जाधव, अनिल जाधव, बाळासाहेब तात्या धायबर,संपत घोडेकर, वैभव ढमाले, समीर कालेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सरपंच निवृत्तीशेठ नेहरे यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Previous articleगडद ग्रामपंचायतीचे सदस्य, उद्योजक चंद्रकांत शिंदे यांचा स्व:खर्चातुन कामांचा धडाका
Next articleदावडी गावातील ट्रान्सफॉर्मर बदलण्याची सरपंच स़ंभाजी घारे यांची मागणी