गडद ग्रामपंचायतीचे सदस्य, उद्योजक चंद्रकांत शिंदे यांचा स्व:खर्चातुन कामांचा धडाका

चाकण- गडद (ता.खेड) ग्रामपंचायतच्या प्रथम ग्रामसभेच्या दिवशी नवनिवार्चित ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शिंदे यांनी गावात विविध क्षेत्रातील जेष्ठ दिवंगत व्यक्तिच्यां स्मरणार्थ बेंचेसच मोफत वाटप केले.

गावात मंदिर, शाळा, गावठाण चौक, एसटी स्टँड येथे बैठक व्यवस्था झाली. गावात प्रथमच अश्या स्तुत्य उपक्रमामुळे गावकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.

गावासाठी नेहमीच योगदान असणारे युवारत्न चंद्रकांत शिंदे यांनी अश्या प्रकाराचे अनेक उपक्रम राबवून भविष्यात गावच्या विकासात मोलाचे योगदान देणार असल्याचे सांगितले.

यावेळी अरुणशेठ चांभारे (मा. सभापती, पुणे जिल्हा परिषद), सौ. मंदाताई सखाराम शिंदे (सदस्या, पंचायत समिती खेड), सुरेशभाऊ शिंदे (मा.सभापती, पं. समिती खेड), सौ. सुगंधाताई शिंदे ( मा. उपसभापती, कृ. उ. बाजार स. खेड), श्री. अमोलभाऊ पानमंद (अध्यक्ष, खेड ता. पच्छिम विभाग), सखारामशेठ शिंदे, देवराम सावंत, सरपंच मारुती तळेकर, रोहिदास शिंदे, तुकाराम शिंदे सर, अरुण कौदरे, शिवाजी सतू शिंदे, तुकाराम डांगले सर, शांताराम सर, लहू बबन शिंदे, सखाराम गबाजी शिंदे सदस्य, संजय शिंदे, उपसरपंच, श्रीकर शिंदे, भाऊसाहेब, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleवाघोलीतील कचरा वाडेबोल्हाईच्या वेशीवर
Next articleकडूस गावातील विविध अडचणी सोडविण्याची ग्रामस्थांची ग्रामपंचायतकडे मागणी