पिपंळे खालसाच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया धुमाळ तर उपसरपंचपदी राजेंद्र धुमाळ यांची बिनविरोध निवड

शिक्रापूर- पिपंळे खालसा (ता.शिरुर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सुप्रिया उमेश धुमाळ तर उपसरपंचपदी श्री.राजेंद्र विठ्ठल धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.

नऊ सदस्य असलेल्या शिरुर तालुक्यातील पिपंळे खालसा गावची ग्रामपंचायत निवडणूक राजकीय द्रुष्टीने अटीतटीची होत असते. गावातील तरुणांमध्ये शिक्षणात होणारी प्रगती पाहता ही निवडणूक आखेर भावकीचे जुने वाद मिटवत नव्या दिशेने झाल्याने अनेक राजकीय खेळीना मोठी खीळ बसवत तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणाला नवीन दीशा देण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये सहा जागेवर बिनविरोध निवडणूक पार पडली तर तीन जागेसाठी निवडून पार पडली
विशेष म्हणजे सदस्य पदाची निवडणूक झाल्या नंतर नऊही सदस्य एकत्र येत सरपंच सौ.सुप्रिया धुमाळ व उपसरपंच श्री.राजेंद्र धुमाळ यांचा एकमेव अर्ज दाखल करत निवड बिनविरोध केली.

यावेळी अश्विनी चंद्रकांत धुमाळ,सारिका दत्तात्रय धुमाळ, शुभांगी विक्रम धुमाळ, मंगल बाळासाहेब सुरसे,अच्युत आण्णासाहेब धुमाळ, विशाल अण्णासाहेब धुमाळ, दिपक बबनराव शेळके या ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन गावच्या विकासासाठी आम्ही सर्वत्र एकत्र येऊन गावाचा विकास करू अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री अमोल बदढे, ग्रामसेवक भालसिंग मॅडम यांनी काम पाहिले .

यावेळी आजी माजी सरपंच ,उपसरपंच, वि.वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन , संचालक मंडळ व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleरांजणगाव एमआयडीसीत कामगारांना लुटणाऱा जेरबंद
Next articleकोरेगाव भीमा ते वढु बु. रस्त्याच्या कामाला साडेसहा कोटींची प्रशासकीय मंजुरी