शिक्षकांला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा ; जुन्नर न्यायालयाचे आदेश

अय्युब शेख, जुन्नर :सावरगाव ( ता.जुन्नर ) येथील शिक्षक यांना मारहाण केले प्रकरणी शिक्षिका सह 5 लोकांवर खाजगी तक्रार जुन्नर न्यायालयाने दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

जुन्नर तालुक्यातील मौजे धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेत येथे कार्यरत असणारे व मूळ सावरगाव चे असणारे शिक्षक युसूफ अमीन आतार यांना 28 सप्टेंबर 2018 रोजी धनगरवाडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव पाटोळे यांचे घरात मोबाइल वरून उधभवलेल्या वाद सोडवत असताना नारायणगाव च्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व त्यांचा पती यांनी व इतर 3 लोकांनी हाताने व लाकडी वस्तूने 5 लोकांनी मारहाण केल्याची खाजगी फिर्याद जुन्नर मेहरबान कौर्टात दाखल केली होती.याच तारखेला शिक्षक युसुफ आत्तार यांचेवर सुद्धा नारायणगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु नारायणगाव पोलिसांनी युसुफ आतार यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती ,त्यांना जुन्नर न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करावी लागली होती .त्यावर वेळो वेळी सुनावणी होऊन मेहरबान जुन्नर न्यायालयाने सहा साक्षीदार तपासून सदर 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आदेशानुसार संशयित निर्मला अशोक डुंबरे व अशोक डुंबरे राहणार नारायणगाव ,शँतनू तांबे ओतूर ,अमित शिवाजी दांगट उंब्रज ,सचिन वाघ नारायणगाव यांचे नावे खाजगी तक्रार जुन्नर न्यायालयाने दाखल करून त्यावर आदेश केला आहे.

याबद्दल शिक्षक युसुफ आतार यांनी सांगितले की मी विजय सत्याचा होईल व मला झालेल्या मानहानी बद्दल निश्चीत जुन्नर मेहरबान कोर्ट योग्य न्याय निवाडा करून दोषींवर योग्य ते शासन करतील मला न्याय देवते वर विश्वास असून मी न्यायालयाने दिलेला निर्णय विश्वास पूर्व मान्य करेल .

Previous article‘संरक्षण तुमचं,संगोपन आमचं’ या अभिनव संकल्पनेतून रानमळा येथे २०० झाडांचे वृक्षारोपण
Next articleनारायणगाव वारूळवाडी परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यामुळे सर्व व्यवहार बंद ;विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – स.पो.निरीक्षक अर्जुन घोडे पाटील