नॅशनल ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सिद्धेश चौधरी याने गावाचे मान वाढविला – आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

नायगाव (ता.हवेली) गावातील सिद्धेश चौधरी याने आसाममध्ये झालेल्या नॅशनल ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून गावाचा राज्याचा मान वाढवला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाने आपल्या भागाचा तसेच आई – वडीलांचे व गुरुजणाचे नाव राज्य पातळीवर आपल्या मध्ये असणाऱ्या क्रीडा कर्तृत्वाने सिद्ध केले यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असे प्रतिपादन शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

१८ वर्षाखालील मुलांच्या चारशे मीटर हर्डल्समध्ये स्वयंम बधे याच्यासोबत चुरस झाली त्यात सिध्देशने ५३.९१ सेकंद वेळ नोंदवून विजय मिळवला.

त्याच्या या कामगिरी बद्दल त्याचा भगवतगीता देऊन सन्मान केला. तसेच आपल्या अशाच मेहनतीच्या बळावर शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे, महाराष्ट्राचे नाव मोठे करत रहा अशा शुभेच्छा ही दिल्या. याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, नायगावचे माजी सरपंच राजेंद्र चौधरी, रायचंद पवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान संचलित मायमाऊली अनाथ वृध्दाश्रमचे उद्घाटन
Next articleरसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर