सदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान संचलित मायमाऊली अनाथ वृध्दाश्रमचे उद्घाटन

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

समाजातील वयोवृध्द महिला व पुरुषांचे दैनंदिन जीवन हे अलिकडच्या काळात फार दयनिय आहे. अशा लोकांना कुणी नातेवाईक नाहीत असले तर कुणीही दखल घेत नाहीत. कोणताही आधार नाही,अशा निराधार स्त्री – पुरुष लोकांना सदगुरु सेवा विकास प्रतिष्ठान संचलित ” मायमाऊली अनाथ वृध्दाश्रम” संस्थेच्या वतीने आधार नसलेल्या लोकांना सामाजिक जाणिव आणि कर्तव्य या उदिष्ठाने संस्था कार्य करणार आहे असे प्रास्ताविक मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक से.नि.महाराष्ट्र राज्य समाजकल्याण उपायुक्त हंबीरराव कांबळे यांनी केले.

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना विषयाचे सविस्तर मनोगतामध्ये मार्गदर्शन हंबीरराव कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे उपस्थित होते.

पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, उपसरपंच मनिषा नंदकुमार कड, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र काळभोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिक्षक सेलचे सरचिटणीस बाळकृष्ण काकडे सर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे, जिव्हाळा वृध्दाश्रमचे अध्यक्ष दत्तात्रय कोलते , महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद अध्यक्ष नवनाथ काकडे, माजी सरपंच आण्णा महाडिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य बापुसाहेब बोधे, पोलीस पाटील वर्षा कड, पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्या लिलावती बोधे, राधिका काकडे, मा.तंटामुक्त अध्यक्ष मुकिंदा काकडे, अशोक कारंडे, पत्रकार सचिन माथेफोड, नितीन करडे , अशोक म्हस्के, तसेच पोलीस मिञ संघाचे पदाधिकारी शोभा हरगुडे, सुनिता कदम, स्वाती पाटगावकर, सुनिता मगदुम, निलम गव्हाणे, संस्थेचे सदस्य गणेश करटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुव्यवस्थापन विठ्ठल फडतरे, नरसिंग मानकरे, राणी दरेकर, वंदना ढोले, वंदना पवार, सरिता खेडेकर, पुष्पलता गायकवाड , सुजाता देवकर, करुणा भोंडवे, आदित्य वाळेकर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत संस्थेचे अध्यक्ष प्रा सुरेश वाळेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन वंदना ढोले यांनी केले तर आभार अशोक कारंडे यांनी मानले.