सुधीर वाळुंज यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील सुधीर वाळुंज यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे . सुधीर वाळुंज यांच्या सह आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथील संतोष केंगले , जळगाव जिल्ह्यातील राजू भास्कर वाकळवाडी येथे आले असता गावकऱ्यांनी गावाच्या वेशी वरूनच ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गावात जंगी स्वागत केले.गावकऱ्यांनी केलेले स्वागत हे अभूतपूर्व असल्याचे मत यावेळी सुधीर वांळुंज यांनी व्यक्त केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांचा वाकळवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.वाळुंज यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन दादा चिंचवडे ,मंगलदास बांदल ,सभापती नवनाथ शेठ होले ,बापूसाहेब थिटे राहुल शेठ तांबे ,ज्ञानेश्वर ढेरंगे ज्योतीताई आरगडे ,अशोक दादा राक्षे, उद्योजक सागर चिंचवडे, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वाळुंज पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते .

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरीब , हुशार व होतकरू मुलांना सर्वतोपरी आर्थिक मदत करणार असल्याचे यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी सांगितले आहे

Previous articleशिरूर शहरात गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
Next articleआंधळगाव येथे रक्तदान शिबिरात ५२ पिशव्या रक्त संकलित