शिरूर शहरात गोळीबार करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

शिक्रापुर -शिरूर शहरातील कॉलेज रस्त्यावर दहशत करून  तरुणावर गोळीबार करत कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या टोळीला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) कलम ३(१)(०),३(४) या वाढीव कलम लावण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २६ जानेवारी २०२१ रोजी प्रवीण गव्हाणे या तरुणावर निलेश उर्फ नानु कुर्लाप याच्या टोळीतील सदस्यांनी कोयत्याने वार करून गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केला असून या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ उर्फ गोप्या संजय यादव, राहुल अनिल पवार, शुभम सतीश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवान भगत, आदित्य औदुंबर डंबरे, शुभम ऊर्फ बंटी किसन यादव यांना अटक करण्यात आले आहे.

सदरचा  गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व आरोपींनी दहशत पसरविणे करिता गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर प्रभावी कारवाई करणे गरजेचे होते.

 पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना कडक कारवाई करणे करिता आदेश दिले होते. या गुन्ह्यातील तपासा दरम्यान आरोपी निलेश उर्फ नानू चंद्रकांत कूर्लाप याने आपले अटक साथीदार व मुकेश उर्फ बाबू उर्फ बाब्या चंद्रकांत कुर्लप , गणेश चंद्रकांत कुर्लप, महेंद्र विठ्ठल येवले, अभिषेक पोपट मिसाळ यांचे सह टोळी करून त्या टोळी आधारे आर्थिक प्राप्तीकरिता  व टोळीची दहशत पसरवण्या करिता गुन्हे केल्याचे निष्पन्न  झाल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) कलम ३(१)(०),३(४) या वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळण्याची मागणी  होती नुसार त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस करीत आहे.

यापुढील काळात अशाप्रकारे बेकायदेशीर आर्थिक प्राप्तीकरिता व दहशत माजवणे करिता गुन्हे केल्याचे आढळून आल्यास गुन्हेगारांवर अशाप्रकारे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Previous articleपुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत राहणार बंद
Next articleसुधीर वाळुंज यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न