घोटवडीच्या सरपंचपदी विष्‍णु दळवी,उपसरपंचपदी अश्विनी धंद्रे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- घोटवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू धोंडू दळवी यांची व उपसरपंचपदी सौ.अश्विनी अजय धंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून एस.डी.गोडे सर्कल अधिकारी, सुरेश अंकुश घनवट ग्रामसेवक, सहाय्यक निवडणूक अधिकारी डी डी कट्टे ,तलाठी भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील सिताराम धंद्रे पाटील यांचे निवडणूक बिनविरोध करणे कामे मोलाचे योगदान लाभले तसेच सविता दामू भवारी, ललिता पारधी ,राजू आढळ ,कविता आढळ हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील रंजना धंद्रे,गबाजी पारधी,संदीप पारधी, दामू धंद्रे,दामू भवारी ,गणपत कचरे ,मारुती कदम ,भीमराव वाघचौरे ,बाळू वाकचौरे,नामदेव पारधी हे ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleआसखेडच्या सरपंचपदी प्राची लिंभोरे बिनविरोध
Next articleमराठी ज्ञानभाषा व्हावी – ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील