आसखेडच्या सरपंचपदी प्राची लिंभोरे बिनविरोध

चाकण- खेड तालुक्यातील आसखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक व खेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे यांच्या पत्नी प्राची कैलास लिंभोरे यांची, तर उपसरपंचपदी रुक्मिणी भरत लिंभोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी सभागृहात प्राची लिंभोरे, ताईबाई सप्रे, संतोष गावडे, रुक्मिणी लिंभोरे, सोनल लिंभोरे आणि अश्विनी लिंभोरे हे सहा सदस्य उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कैलास लिंभोरे, नथुराम लिंभोरे, पोपट लिंभोरे, बबन लिंभोरे, तानाजी लिंभोरे, कुंडलिक लिंभोरे, बाळासाहेब लिंभोरे, मारुती लिंभोरे, भरत लिंभोरे, काशिनाथ लिंभोरे, सदाशिव लिंभोरे, मारुती रोकडे आदींनी प्रयत्न केले.

Previous articleपुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १४ मार्चपर्यंत राहणार बंद
Next articleघोटवडीच्या सरपंचपदी विष्‍णु दळवी,उपसरपंचपदी अश्विनी धंद्रे यांची बिनविरोध निवड