अजितदादाचें काँल रेकाँडिंग ऐकून डॉक्टर आले ताळ्यावर

प्रमोद दांगट, जुन्नर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामात नेहमीच तरबेज असतात याचा अनुभव ही अनेकदा आला आहे.असाच अनुभव आला आहे जुन्नर तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबाला जुन्नर तालुक्यातील एका महिलेची महात्मा फुले योजने अंतर्गत प्रसूती व उपचार करण्यात आले प्रसूती झाल्यानंतर हा डॉक्टर त्यांच्याकडे पैसे मागत होता या बाबत या कुटुंबातील महिलेच्या भावाच्या मित्र विशाल शिंदे या तरुणाने थेट अजित पवार यांना फोन करून ते रेकॉर्ड डॉक्टरला ऐकवले असता डॉक्टरांनी रुग्णांना डिस्चार्ज देत त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी भरलेले तीन हजार रुपये परत केले आहेत.

याबाबत विशाल शिंदे यांनी सांगितले की मागील आठवड्यात माझ्या मित्राच्या बहीणीला प्रसूतीसाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. महात्मा फुले जन आरोग्य योजने मार्फत विनामूल्य प्रसूती व इतर सेवा उपलब्ध असतानाही डाॅक्टर महिलेची प्रसूती झाल्यानंतर २५ हजार रुपये द्या तरच पेशंट घरी घेऊन जा असे म्हणून अडवणूक करू लागले.

पेशंट च्या नातेवाईक”याच्याकडे पैसे नव्हते तसेच हे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असूनही डॉक्टर वारंवार पैसे मागत असल्याने विशाल शिंदे यांनी थेट अजित पवार यांना फोन लावून झालेला प्रकार सांगितला यावेळी अजित पवार यांनी डॉक्टरांना फोन दे ते काही चुकीचे करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले’ त्यावेळी विशाल शिंदे हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना फोन देतो असे सांगितले विशाल हा फोन घेऊन दवाखान्यात गेला असता डॉक्टर दवाखान्यात नसल्याने विशालने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेले संभाषण रेकॉर्डिंग डॉक्टरांच्या मोबाईल वर पाठवले आणि ते ऑडिओ रेकॉर्ड ऐकल्यावर डॉक्टर यांनी रुग्णाला लगेच डिस्चार्ज दिला व अॅडमिट करताना घेतलेले तीन हजार रुपये परत दिले.”अजित दादा पवार यांच्या फक्त कॉल रेकॉर्डिंग ऐकल्याने आमच्या ताई ला घरी सोडण्यात आले. त्यांच्या फोन मुळे अरेरावी करणारा डॉक्टर ताळ्यावर आले असल्याने शिंदे यांनी समाधान व्यक्त करत अजितदादांचे आभार मानले.

Previous articleप्रसिद्धी पेक्षा कामाला महत्त्व देणारे बाप – लेक
Next article‘संरक्षण तुमचं,संगोपन आमचं’ या अभिनव संकल्पनेतून रानमळा येथे २०० झाडांचे वृक्षारोपण