फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट – आंबेगाव तालुक्यातील पांचाळे बुद्रुक येथील एका व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून समाजात तेढ निर्माण केल्याचे कृत्य केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद घोडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस जवान दीपक काशीद यांनी दिली आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की पांचाळे बुद्रुक येथील समीर मच्छिंद्र गारे याने मोबाइल क्र. ९१६८१९२८२३ वरून फेसबुक अकाऊंट तयार करून
धार्मिक श्रध्दांचा अपमान होऊन समाजातील धार्मिक भावनांवर गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे लक्षात येताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस जवान दीपक काशिद यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पो. निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान एस. एम. लांडे करीत आहेत.

Previous articleभीमाशंकर घोडेगाव रोड वर ढंपरची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी
Next articleगंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला मंचर येथे पकडले