भीमाशंकर घोडेगाव रोड वर ढंपरची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

प्रमोद दांगट , निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंचर भीमाशंकर रोड वर (दि २४) रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान निघोटवाडी गावच्या हद्दीत भारत बेंज कंपनीचा हायवा ढंपरचा मोटारसायकलला धक्का बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की (दि २४ )रोजी सायंकाळी 5:15 वाजताच्या सुमारास विजय ज्ञानेश्वर लांडे ( वय 55 रा. लांडेवाडी ता. आंबेगाव जि. पुणे) हे मंचर वरून लांडेवाडी येथे त्यांची दुचाकी एम.एच.14 बी.यु.9502 वरून जात असताना निघोटवाडी गावच्या हद्दीत भारत बेंज कंपनीचा हायवा डंपर एम. एच.12 के.पी.7252 या गाडीने मोटारसायकलला ओव्हरटेक करत असताना गाडीच्या ड्रायव्हर साईटने जोरात धक्का लागल्याने अपघात होऊन या अपघातात विजय ज्ञानेश्वर लांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत गणेश विजय लांडे ( रा.लांडेवाडी ता.आंबेगाव पुणे ) याने डंपर चालक अविनाश आश्रुबा शिंदे ( रा.कोळवाडी ता. बीड याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस नाईक आढारी करत आहे.

Previous articleभीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रा रद्द
Next articleफेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल