भीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रा रद्द

सिताराम काळे, घोडेगाव – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीची खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांनी दि. १० मार्च ते १२ मार्चपर्यंत महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आले असल्याचा निर्णय प्रशासन व देवस्थान यांनी संगनमताने घेतला आहे.

बारा ज्योर्तिलींगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या यात्रेला विशेष महत्व असल्याने येथील पवित्र शिवलींगाचे दर्शनासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने होते. तसेच या दिवसांच्या यात्रेचे मोठया उत्साहात आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना विषाणूजन्य आजाराच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता सरकारकडून सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. त्याच धर्तीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. दि. १० ते १२ मार्च या तीन दिवस भीमाशंकर व आजुबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दि. १० मार्च ते १२ मार्चपर्यंत महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी येणा-या भाविक भक्तांनी या दिवसांमध्ये कोणीही भीमाशंकरला येऊ नये, शिवभक्तांनी आपल्या घरीच भगवान शंकराची प्रार्थना करावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Previous articleआमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची कहाणी
Next articleभीमाशंकर घोडेगाव रोड वर ढंपरची धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी