आमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची कहाणी

अमोल भोसले,उरुळी कांचन

आमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची अशी एक कहाणी परवा तीन वाजता आमदार निलेश लंके यांच्या सहकार्य सर्व मुंबईतील कॅबिनेटची मिटिंग आटोपुन नगरला येत होते.वाटेत वाघुंडे गावाजवळ एका मोटरसायकलवर कुडकुडत नवरा बायको एक मुलगा चालले होते.
नेत्यांनी हे पाहिल्यावर गाडी थांबवली व त्यांच्याकडे चौकशी केली कुठे जायचं असेल तर गाडी देण्याची तयारी दर्शवली, ते पुण्याहून आले होते व औरंगाबादला चालले होते.

एवढ्या लांबवर मोटरसायकलवर जाऊ नका. असे आमदारांनी सांगितले. परंतु त्या जोडप्याने आम्ही पुण्याहून आलो असून औरंगाबादला अंत्यविधी साठी चाललो आहोत.नेत्यांनी औरंगाबादला जाण्यासाठी गाडी देण्याची तयारी दर्शविली पण त्या पुरुषाने सांगितले की आम्ही औरंगाबादला अंत्यविधीसाठी जात आहोत. तेथे आम्हाला दोन दिवस थांबावे लागेल, आपण ओळख नसताना एव्हड्या रात्री आमची आपुलकीने विचार पूस केल्याबद्दल धन्यवाद. नंतर पुढे येऊन नेते सुपा एमआयडीसी चौकात थांबले, त्या मोटारसायकल स्वारास थांबवून , आपुलकीने आदर सत्कार केला चहा नास्ता खाऊ घातला, आपल्या गाडीमधील दोन शाली त्यांच्या अंगावर घातल्या, व सावकाश जा पोहचल्यावर फोन करा, कोणतीही अडचण आली तर मला सांगा असे सांगून त्यांचा निरोप घेतला.

कोणतीही ओळख नसताना तो मतदार संघातील नसताना दाखवलेले दातृत्वाने आम्ही सर्वजण अगदी भारावून गेलो, असे नेते पुन्हा होणे नाही, याची मनोमन पुन्हा प्रचिती आली.यावेळी त्यांच्याबरोबर अशोक शिंदे, सचिन देवकर, दादा दळवी हे कार्यकर्ते प्रवास करत होते. चासच्या अशोक शिंदे यांनी घडलेली ही घटना माध्यमाशी बोलताना सांगितली.

Previous articleवरच्या भांबुरवाडीच्या सरपंचपदी विजय थिगळे उपसरपंचपदी निता ढोरे
Next articleभीमाशंकर येथील महाशिवरात्र यात्रा रद्द