वरच्या भांबुरवाडीच्या सरपंचपदी विजय थिगळे उपसरपंचपदी निता ढोरे

Ad 1

राजगुरूनगर- वरच्या भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजय शांताराम थिगळे व निता अनिल ढोरे यांची निवड झाली आहे

सरपंच पदाकरिता विजय शांताराम थिगळे यांना चार मते पडली व अमोल सखाराम वाळुंज यांना तीन मते तसेच उपसरपंच पदाकरिता नीता अनिल ढोरे यांना तीन मते पडली व नीलिमा सोपान राक्षे यांना तीन मते पडली. सरपंचपदी श्री विजय शांताराम थिगळे यांची व उपसरपंच पदी सौ निता अनिल ढोरे यांची निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी सौ चारूबाला हरडे शाखा अभियंता नगरपरिषद खेड व श्री सुरेश घनवट सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

तंटामुक्ती अध्यक्ष श्री विकास भांबुरे माजी सरपंच सुभाष वाळुंज उत्तम वेहळे,वेहळे गुरुजी बाळासाहेब थिगळे माऊली थिगळे रामचंद्र थिगळे पंकज रोडे शिवाजी भांबुरे विशाल रोडे भाऊसाहेब ढोरे अनिल ढोरे अर्जुन राक्षे सुरेश राक्षे प्रवीण घुमटकर महेश रासकर सौ अनिता बाळासाहेब वाळुंज सौ मनीषा थिगळे अनिता सुरेश राक्षे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच अनिता राक्षे नीता ढोरे किशोर सोपानराव रोड माधुरी वाळुंज इत्यादी उपस्थित होते

Previous articleकाळुस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री पवळे पाटील व उपसरपंचपदी यशवंत खैरे यांची बिनविरोध निवड
Next articleआमदार निलेश लंके यांच्या दातृत्वाची कहाणी