वाकळवाडीच्या सरपंचपदी मंगल कोरडे , उपसरपंचपदी जयसिंग पवळे

राजगुरूनगर : वाकळवाडीच्या (ता. खेड) सरपंचपदी मंगल महादू कोरडे यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंचपदी जयसिंग किसन पवळे यांची निवड झाली, जयसिंग पवळे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा चार विरुद्ध तीन अशा मतांनी पराभव केला.

वाकळवाडी ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंचपदाची निवड ही निवडणुकीतूनच होणार हे स्पष्ट झाले होते. त्या नुसार गुरुवार ( ता. २५ ) रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत सरपंच पदासाठी मंगल महादू कोरडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली . उपसरपंच पदासाठी जयसिंग किसन पवळे आणि रुपाली खुशाल पवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माघारीच्या काळात कोणीही माघार न घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दिवे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक पार पडली.

 

यामध्ये जयसिंग पवळे यांनी रूपाली पवळे यांचा चार विरूद्ध तीन अशा मतांनी पराभव केला. सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेविका अनिता आमराळे यांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी नवनिर्वाचीत सदस्य सोपान बबन भालेकर, शैला शशिकांत बांगर,कु.नरेंद्र संभाजी वाळुंज,कु.शिवराज्ञी धर्मराज पवळे उपस्थित होते.

विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गूलाल व भंडाऱ्याची उधळण करत गावातून ग्रामप्रक्षिणा करत वाळकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले.

Previous article… रमणकाका माळवदकर संघर्षमय आयुष्याची सांगता
Next articleवरच्या भांबुरवाडीच्या सरपंचपदी विजय थिगळे उपसरपंचपदी निता ढोरे