रेटवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी पवार ; उपसरपंचपदी निलम हिंगे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- रेटवडी ( ता. खेड ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ गौरी नवनाथ पवार तर उपसरपंचपदी सौ निलम सुभाष हिंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रेटवडी ग्रामस्थांनी आपल्या गावाचा गावकारभाऱ करण्यासाठी नवीन सदस्यांना संधी दिली होती व अकरा जागांपैकी आठ जागा बिनविरोध निवडून दिले होते

सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बुधवार ( ता. 24 ) रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी सौ गौरी नवनाथ पवार यांनी तर उपसरपंच पदासाठी सौ निलम सुभाष हिंगे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरण्याच्या मुदतीत दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री संतोष रोडे यांनी सरपंचपदी सौ गौरी पवार व उपसरपंच पदी सौ निलम हिंगे या उमेदवारांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप डुबे ,श्री किरण पवार , श्री शांताराम शिंदे ,सौ सुनंदा पवार ,सौ माया थिटे उपस्थित होते.

तसेच ग्रामविकास अधिकारी श्री आर टी सात्रस , तलाठी भाऊसाहेब श्री आरदवड , पोलीस अधिकारी घोडे साहेब , पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे , तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे ,मा उपसरपंच नवनाथ पवार ,सुभाष हिंगे , अतुल थिटे , राजू जाधव , अनिल पवार ,शंकर काळे , शरद वाबळे , संजय हिंगे , विलास थिटे , रामदास रेटवडे ,माणिक रेटवडे ,चेअरमन संतोष डुबे , निवृत्ती पवळे , विलास पवार , संजय पवार , कैलास हिंगे ,सतीश वाबळे , युवराज गोपाळे ,विलास पवळे ,रामदास देशमुख , चेअरमन सुरेश रेटवडे ,योगेश रेटवडे , चंद्रकांत पवळे व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीनंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा श्री रोकडोबा महाराजांच्या मंदिरात सत्कार करण्यात आला

Previous articleगोसासी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष गोरडे तर उपसरपंचपदी धोंडीभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड
Next article… रमणकाका माळवदकर संघर्षमय आयुष्याची सांगता