शिरुर नगरपरिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजीत पाचर्णे

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर नगरपरिषद विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.

शिरुर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे. विकास आघाडीच्या बैठकीत सभापती पदाच्या नावांची निवड करण्यात आली. यानुसार आज झालेल्या निवडणूक प्रक्रिया दरम्यान अर्ज दाखल करण्यात आले.

विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लैला शेख यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.उल्लेखनीय काम केल्याबद्दल धारिवाल यांनी स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा जलविकास व विद्युत समितीच्या सभापतीपदी अनुक्रमे विठ्ठल पवार व मुजफ्फर कुरेशी यांना पुन्हा संधी दिली. पवार यांना तिसऱ्यांदा तर कुरेशी यांना दुसऱ्यांदा सभापतीपद बहाल करण्यात आले आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे, नवनिर्वाचित सभापती, सदस्यांसह नगरसेवक मंगेश खांडरे, निलेश गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

समिती,सभापती व सदस्यांची नावे पुढील प्रमाणे
नियोजन व विकास समिती सभापती – प्रकाश रसिकलाल धारीवाल. सदस्य – विजय बालचंद दुगड, संजय दत्तात्रय देशमुख, उज्वला वैभव वारे, नितीन मच्छिंद्र पाचरणे,सार्वजनिक बांधकाम समिती, सभापती – अभिजीत गणेश पाचर्णे. सदस्य, संगीता महेंद्र मल्लाव, विनोद प्रकाश भालेराव, संजय दत्तात्रय देशमुख, नितीन मच्छिंद्र पाचर्णे. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती, सभापती – विठ्ठल प्रभू पवार. सदस्य, उज्वला अभय बरमेचा, मनीषा यशोधन कालेवार, पूजा निलेश जाधव, संदीप ज्ञानदेव गायकवाड.पाणीपुरवठा जलविकास व विद्युत समिती सभापती- मुजफ्फर यासीन कुरेशी. सदस्य, विजय बालचंद दुगड, सुरेखा संतोष शितोळे, सुनीता पोपट कुरंदळे, संदीप ज्ञानदेव गायकवाड. शिक्षण समिती सभापती – सचिन गुलाब धाडीवाल. सदस्य, रोहिणी किरण बनकर,उज्वला अभय बरमेचा, संगीता महेंद्र मल्लाव,नितीन मच्छिंद्र पाचर्णे,महिला व बालकल्याण समिती सभापती – ज्योती चंद्रकांत लोखंडे उपसभापती अंजली मयुर थोरात. सदस्य – मनीषा यशोधन कालेवार, सुरेखा संतोष शितोळे, रोहिणी किरण बनकर, संदीप ज्ञानदेव गायकवाड.

Previous articleदावडीच्या सरपंचपदी संभाजी घारे उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड
Next articleगोसासी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष गोरडे तर उपसरपंचपदी धोंडीभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड