दावडीच्या सरपंचपदी संभाजी घारे उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या दावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संभाजी घारे, तर उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या वेळी नवनिर्वाचित सदस्य राणी डुंबरे पाटील, माधुरी खेसे, पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर, अनिल नेटके, संतोष सातपुते यांच्यासह श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे प्रमुख सचिन नवले, माजी सरपंच सुरेश डुंबरे पाटील, भाऊसाहेब होरे, मारुती बोत्रे, साहेबराव दुंडे, हिरामण खेसे, तुकाराम गाडगे, संतोष गावडे, केरभाऊ म्हसाडे, पांडुरंग दुंडे, रुपेश घारे, संगीता होरे, ऋषिकेश बेल्हेकर, राहुल सातपुते, बाळासाहेब कान्हूरकर, रामदास बोत्रे, अतुल सातपुते, उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सीताराम तुरे यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेसाठी तलाठी सतीश शेळके, ग्रामसेवक तानाजी इसवे, पोलिस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, बिट अंमलदार पोलिस संतोष मोरे यांनी सहकार्य केले.

Previous articleदावडीच्या सरपंचपदी संभाजी घारे उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड
Next articleशिरुर नगरपरिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजीत पाचर्णे