कनेरसर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता केदारी यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- कनेरसर (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कुलस्वामिनी ग्रामविकास पॅनेलच्या सुनीता दत्तात्रय केदारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अनुसूचित जमाती साठी सरपंच पद राखीव व त्या प्रवर्गातील केदारी या एकमेव सदस्य होत्या.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय जमदाडे यांनी काम पाहिले.

कुलस्वामिनी ग्रामविकास पॅनेलचे ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर, सीमा दौंडकर, सुरेखा दौंडकर, रेश्मा म्हसुडगे यावेळी उपस्थित होते.

यावेळी सरंपचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांचे वतीने दिलीपराव माशेरे,जवाहर दौंडकर, प्रशांत म्हसुडगे यांनी सौ.सुनीता केदारी यांचा सत्कार केला.

 यमाई देवी मंदिरात सभा झाली.सरपंच केदारी यांनी गावच्या विकासासाठी कार्यरत राहिल अशी ग्वाही दिली. माजी उपसरपंच जवाहर दौंडकर यांनी स्वागत केले तर माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव माशेरे यांनी आभार मानले.

कुलस्वामिनी ग्रामविकास पॅनेलचे बापु दौंडकर, सुहास दौंडकर ,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंचपद कुलस्वामिनी ग्रामविकास पॅनेलला मिळाल्याने सत्तेची सूत्रे हाती आली असून ग्रामस्थांची विकासाची अपेक्षापूर्ती झाली पाहिजे.

Previous articleकमान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगेश नाईकरे ; उपसरपंचपदी मोनिका नाईकरे यांची बिनविरोध निवड
Next articleदावडीच्या सरपंचपदी संभाजी घारे उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड