कमान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगेश नाईकरे ; उपसरपंचपदी मोनिका नाईकरे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- कमान ( ता. खेड ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भैरवनाथ ग्रामविकास जनसेवा पॅनेलचे योगेश पोपट नाईकरे तर उपसरपंचपदी मोनिका विश्वनाथ नाईकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कमान ग्रामस्थांनी आपल्या गावाचा गावकारभाऱ करण्यासाठी नवीन सदस्यांना संधी दिली होती व निवडणूकही जोमात झाली होती.

सरपंच व उपसरपंचपदाची निवड हि निवडणुकीतूनच होणार असे संकेत होते व त्याप्रमाणे झालेही तसेच. बुधवार ता. 24 रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या निवडणूकीसाठी सरपंच पदासाठी योगेश पोपट नाईकरे व अमोल ज्ञानेश्र्वर नाईकरे यांनी तर उपसरपंच पदासाठी मोनिका विश्र्वनाथ नाईकरे व अश्विनी बाजीराव नाईकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र माघारीच्या मुदतीत अमोल नाईकरे व अश्विनी नाईकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश नामदेव पवार यांनी सरपंचपदी योगेश नाईकरे व उपसरपंच पदी मोनिका नाईकरे या उमेदवारांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.

या वेळी वरील उमेदवारांसह नवनिर्वाचीत सदस्य सतिष बबनराव नाईकरे, मच्छिंद्र गोपाळ रोकडे, पुष्पा तान्हाजी नाईकरे, इंदुबाई गणेश नाईकरे व सुनिता राजेंद्र निर्मळ हे सर्व सदस्य उपस्थीत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक रविंद्र पाटिल यांनी काम पाहिले. उपस्थीत ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करत आनंद व्यकत् केला. यावेळी फौजी सुनिल नाईकरे, सुरेश नाईकरे, भरत नाईकरे, संदिप मुळूक, अशोक नाईकरे, भानुदास नाईकरे, गोविंद रोकडे, नामदेव जाधव, हरिभाऊ नाईकरे, वैभव नाईकरे, दामोधर नाईकरे यांसह नागरिक उपस्थित होते. खेड पोलीस स्टेशनचे ए. पी. वंजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleगावपातळीवर सांडपाणी व घनकच-याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज – गटविकास अधिकारी जालींदर पठारे
Next articleकनेरसर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता केदारी यांची बिनविरोध निवड