मोई विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालकपदी मारुती येळवंडे व विशाल गवारी यांची निवड

Ad 1

सोमनाथ टोपे,चाकण: खेड तालुक्यातील मोई येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री मारुती एकनाथ येळवंडे व विशाल गवारी यांची निवड करण्यात आली.

सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पै समीरदादा गवारे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ संचालक निवडण्यात आले. या वेळी सोसायटीचे ह्यईसचेयरमन व संस्थेचे सर्व संचालक यांच्या हस्ते दोन्ही संचालकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे नेते व आदर्श गाव मोईचे माजी आदर्श सरपंच राहुलदादा गवारे , ग्रामपंचायत सदस्य किरण गवारे गोरखबाप्पू गवारे , ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक देविदास मेदनकर गावातील असंख्य तरुण वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते. सोसायटीच्या दोन्ही तज्ञ संचालकांचा निवडीबद्दल आदर्श गाव मोई ग्रामस्थांच्या वतीने सचिव निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.

Previous articleशिवरायांच्या मावळ्यांनी दुबईत घराघरात शिवजयंती केली साजरी
Next articleस्वाती सावंत यांची भाजपा महिला मोर्चा शिक्षक पुणे शहरअध्यक्ष पदी निवड