संतोष केंगले यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

Ad 1

सिताराम काळे ,घोडेगाव

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी येथील संतोष मुरलीधर केंगले यांची एमपीएससी परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहे.

वडील मुरलीधर, भाऊ व पत्नी यांचा त्यांच्या यशात सहभाग आहे. वडीलांच्या अपार कष्टातून झालेले हे चीज आहे. पोलीसमध्ये त्यांनी १० वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गावक-यांना सुध्दा अभिमान असल्याचे त्यांचे मित्र मारूती केंगले यांनी सांगितले.

माजी सरपंच मारूती केंगले, सखुबाई केंगले, ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी, माजी सैनिक मुरलीधर केंगले, हनुमान सामाजिक प्रतिष्ठान तरूण मंडळ जांभोरी गावठाण, ग्रामविकास प्रतिष्ठाण नांदूरकीचीवाडी व समस्त ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केेले आहे.