पिंपळे खालसाला आर.आर पाटील सुंदर गाव पुरस्कार

शिक्रापूर-पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेतून तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारा सह दहा लाख रुपये निधी देऊन गावाला गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळविण्यासाठी गावातील सर्व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच सिएसआर फंडातून गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, अंतर्गत रस्ते यांसह आदी उपक्रम राबविण्यात आले, त्यांनतर गावाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार तसेच दहा लाख रुपये निधी देण्यात आला.

या आधी देखील तत्कालीन गृहराज्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान मोहिमेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्काराने पिपंळे खालसाला सन्मानीत करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी सरपंच समीर धुमाळ व ग्रामविकास अधिकारी शीतल भालसिंग यांनी हा पुरस्कार नुकताच स्विकारला.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleवाघोलीत ‘रयतेच्या राजा’ला जयंतीनिमित्त अभिवादन
Next articleटिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या ; केसनंद मधील प्रकार