मंचर पोलीस ठाण्यात मोबाईलवर रेकॉर्डिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Ad 1

प्रमोद दांगट , निरगुडसर

मंचर पोलीस ठाण्यात वार्तालापाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शासकीय गोपनीयतेचा भंग केल्या प्रकरणी गणेश गंगाराम बागल (वय ३८, रा. रांजणी,ता. आंबेगाव) यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी (दि. १८ ) मंचर पोलीस ठाणे अंमलदार कक्षात बागल याच्या विरोधात तक्रार असताना त्यास तक्रारदार येईपर्यंत थांबून राहा, असे सांगितले असताना गणेश बागल याने पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्याच्याकडे असलेल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.सदर प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात पोलिस स्टेशन मधील ठाणे अमलदार कक्षा मधील वार्तालाप ऑडीओ मिळाले.बागल याने गोपनीयतेचा भंग केल्याने त्याच्या विरोधात पोलीस नाईक अजित मडके यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.