साक्षीगंधाच्या कार्यक्रमात गर्दी केल्याने कार्यालय मालकावर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून सरकारने कठोर पाऊले उचलल्यास सुरवात केली आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही समारंभाला पन्नास लोकांपेक्षा जास्त गर्दी कर नये असा आदेश असतानाही लोकसेवक यांच्या आदेशाचे उल्लंघन करत मंचर येथील साक्षी गंध सोहळ्याला दीडशे ते दोनशे लोकांची गर्दी केल्याने गणराज मंगल कार्यालय मालक सिताराम मथाजी लोंढे व कार्यमालक रामदास केशव खानदेशे ( रा.मंचर ता.आंबेगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मंचर गावचे हद्दीत असलेल्या गणराज मंगल कार्यालयात कार्यालय मालक सीताराम लोंढे यांनी रामदास खानदेशे यांचे मुलाच्या साक्षी गंधाच्या कार्यक्रमानिमित्त दीडशे ते दोनशे लोक सहभागी करून गर्दी केली. या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता लोक सेवकाने दिलेल्या आदेशाचा अवमान करून कोरोना विषाणू संसर्ग हा साथीचा रोग पसरण्यास मदत होईल असे वर्तन केले आहे.त्यामुळे त्यांच्या विरुद्ध त्यामुळे विरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सह साथीचे रोग कायद्या नुसार पो.काँ. मंगेश लोखंडे, यांनी फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पो.ना.एन. डी. नाईकडे, करत आहेत.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पो. नि. सुधाकर कोरे यांनी पोलिसांना दिलेत आहेत. तसेच गेल्या आठवड्यापासून सर्वत्र कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंड आकारणी सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोरोनावर प्रतिबंध ठेवण्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पो.नि.सुधाकर कोरे यांनी केले आहे.

Previous articleसायकल राईड २०२१ ला शिरूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद
Next articleमंचर पोलीस ठाण्यात मोबाईलवर रेकॉर्डिंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल