गंगापूर खुर्द येथे धाडसी दरोडा, ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंगापूर खुर्द येथे चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून बंद घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे सात लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत घर मालक भीमसेन नथु येवले यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.या धाडसी दरोड्यामुळे आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार भीमसेन नथू येवले हे आपल्या घरी एकटेच राहत असून त्यांची मुले कामानिमित्त बाहेर राहतात दि.३० रोजी भिवसेन येवले यांची तब्येत बरोबर नसल्याने ते कळंब ता.आंबेगाव येथील आपल्या मुलीकडे दोन दिवस गेले होते त्यानंतर दि.२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते आपल्या घरी गंगापूर खुर्द येथे आले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलेले कुलूप दिसले नाही दरवाजा फक्त कडी लावली असल्याने ति उघडून ते आत गेले असता आत मधील फर्निचरचे ड्राव्हर उघडले होते व सामान अस्ताव्यस्त पडले होते.त्यांनी याबाबत आपला मुलगा सदानंद मुलगी वर्षा यांना फोन करून सांगितले.

भिवसेन नथु येवले यांच्या घरातील १ ) १ लाख रुपये किंमतीचा काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ६० इंची एल.ई.डी.स्मार्ट टी.व्ही, २) २५ हजार रुपये किंमतीचा काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ४२ इंची एल.ई.डी.टी.व्ही, ३) ७५ हजार रुपये किमतीची एक साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन, ४)२७ हजाराचे एक ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान गंठण, ५) ४५ हजार रुपये किमतीचे एक 18 ग्रम वजनाची सोन्याची कोल्हापुरी फन्सी माळ, ६) ५० हजार किमतीचे एक दोन तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, ७) ३ लाख रुपये किमतीचे एक सहा तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, ८)७५ हजार रु,किमतीचे एक तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ९) ८ हजार रु रोख रक्कम असा एकुण ७ लाख ५ हजाराची घरफोडी झाली असून याबाबत भीमसेन येवले यांनी अज्ञात चोरटया विरुध्द फिर्याद दाखल केली आहे.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता
Next articleशरद पवारसाहेबच माझे गुरू;माझ्या जडणघडणीत पवार साहेबांचे मोठे योगदान- जयंत पाटील