पारनेर बस स्थानकातून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून अष्टविनायक दर्शनासाठी भाविकांना अल्प दरात बस उपलब्ध

अमोल भोसले

अष्टविनायक यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांशी आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी संवाद साधला. त्यावेळेस सर्वांनी हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे सांगितले अष्टविनायकाचे दर्शन घडणार असल्याचा आनंद सर्वांच्या चेहरयावर दिसून येत होता .

या यात्रेसाठी जाणारे सर्वच भाविक हे गरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील होते. जे हजारो रुपये खर्च करून स्वतःची गाडी करून देव दर्शनासाठी जाऊ शकत नाही अश्या सर्व भाविक भक्तांनी या ट्रिपच्या माध्यमातून दर्शन घेण्याची संधी सोडली नाही. याच पार्श्वभूमीवर पारनेर आगार प्रमुख अमोल कोतकर व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी यांच्याकडे आमदार निलेश लंके यांनी विनंती केली.

माझ्या गोर गरीब जनते साठी वेगवेगळ्या सणावाराच्या निमित्ताने तुम्ही अशाच पद्धतीने अल्प दरात बस उपलब्ध करून देऊन वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आमदार निलेश लंके म्हणाले सदर भावीक भक्तांना अष्टविनायक यात्रेसाठी हिरवा झेंडा दाखवत त्यांची यात्रा सफल व आरामदायी होवो यासाठी पारनेर नगरचे आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous article“वर्दीतलं देखणं रुप” महाराष्ट्र पोलीसांसाठी एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन
Next articleअट्टल खंडणीबहाद्दर हरीश कानसकरसह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल