“वर्दीतलं देखणं रुप” महाराष्ट्र पोलीसांसाठी एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन

सुचिता भोसले

पोलीस म्हणजे कर्तव्य,पोलीस म्हणजे जबाबदारी, पोलीस म्हणजे निष्ठा आणि पोलीस म्हणजे रक्षा.“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” चा वसा हाती घेवून अहोरात्र जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नेहमीच सज्ज असतात, नेहमीच आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांना ना कुठला सण साजरा करता येतो, ना आपल्या कुटुंबाला पुरेशा वेळ देता येतो पण तरीही कुठलीही कुरबुर न करता आपले कर्तव्य बजावत असतात. अगदी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता जनतेसाठी झटत असतात. कोविड काळात तर पोलीस देवदूत बनून उभे राहिले, या जीवघेण्या रोगाशी लढण्यात त्यांचा खुप मोठा वाटा आहे. आणि त्या साठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांच्यातील एक माणुस, एक कलाकार दडलेला आहे याची कल्पना सर्वांनाच असते आणि त्याच्यातल्या त्या कलाकाराला, त्या वर्दी मागच्या देखण्या रूपाला लोकांच्या समोर आणण्यासाठी कुसुमवत्सल्य फाऊंडेशन घेऊन येत आहेत एक अनोखी अभिनव स्पर्धा.

कुसुमवत्सल्य फाऊंडेशन द्वारा आयोजित “खाकीतला राजकुमार, खाकीतली राजकुमारी, खाकीतली राणी” वर्दीतलं देखणं रुप अशा विविधरंगी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण
९७६४७८९६६९ / ९८२२१३३१०८ या क्रमांकावर अधिक महितीसाठी संपर्क करावा असे आवाहन कुसुमवत्सल्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली पाटील यांनी केले आहे.त्यासाठी आपणांस नाममात्र शुल्कामध्ये ऑनलाइन फॉर्म भरणे आहे,फॉर्मसोबत एक स्वताचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.त्यानंतर आपणास प्रसिद्ध आणि अनुभवी ग्रूमिंग एक्स्पर्ट्स कडून प्रशिक्षण देण्यात येईल त्यातून ऑनलाइन उपांत्य फेरी होईल आणि मग अंतिम फेरीसाठी निवड होईल.या निवडलेल्या स्पर्धकांसाठी एक वेशभूषा स्पर्ध” चे आयोजन करण्यात येईल.ही स्पर्धा आपल्या आवडत्या ठिकाणी ३ दिवस आणि २ रात्रींसाठी आयोजित करण्यात येईल.विजेत्यांना मुकुट आणि आकर्षक बक्षीस देण्यात येतील आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सुद्धा सहभागाचे प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.अशी माहिती सौ.वैशाली पाटील यांनी दिली आहे

Previous articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेखक अशोकराव टाव्हरे प्रकाशित करणार
Next articleपारनेर बस स्थानकातून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून अष्टविनायक दर्शनासाठी भाविकांना अल्प दरात बस उपलब्ध