केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेखक अशोकराव टाव्हरे प्रकाशित करणार

राजगुरूनगर-कनेरसर (ता. खेड. जि. पुणे ) येथील लेखक अशोकराव टाव्हरे यांना विकासाचा राजमार्ग या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला आहे.

अभाविप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचा कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, 2014 पासून केंद्र सरकारमध्ये भुपृष्ठवाहतुक, जलमार्ग, नदी विकास, जलसंधारण तसेच लघु,सुक्ष्म, मध्यम उद्योग खात्यांची जबाबदारी पार पाडताना केलेले अतुलनीय कार्य, पंतप्रधान पदासाठी सक्षम दावेदार हा गडकरींचा राजकीय प्रवास लेखक अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकात अंतर्भूत केला आहे.
दि.6 जानेवारी 2019रोजी केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या आवृत्तीचे तर दि 13 डिसेंबर 2020 रोजी दुसरी आवृत्ती माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची भारतभर स्तुती होत आहे. रस्ते विकासातून देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वेगाने कार्यरत आहेत.
भारतभर त्यांच्या कार्याची ओळख सामान्य नागरिकांपर्यंत जावी यासाठी इंग्रजी अनुवादाबाबत अशोकराव टाव्हरे यांनी नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी याबाबत लेखी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.अशोकराव टाव्हरे हे एम.ए.(इंग्रजी)शिक्षित असून 15वर्षे शिक्षक म्हणून काम केल्याचा मोठा अनुभव पाठीशी असल्याने स्वतः इंग्रजी अनुवाद करून एप्रिलमध्ये पुस्तक प्रकाशित करणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग या पुस्तकाचे लेखन करण्याची संधी व आता इंग्रजी मध्ये अनुवाद यामुळे लेखक म्हणून जी जबाबदारी मिळाली याचा निश्चितच् अभिमान आहे असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.

Previous articleबालगंधर्व रंगमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन ऐतिहासिक गीताचे प्रदर्शन संपन्न
Next article“वर्दीतलं देखणं रुप” महाराष्ट्र पोलीसांसाठी एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन