बालगंधर्व रंगमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन ऐतिहासिक गीताचे प्रदर्शन संपन्न

प्रमोद दांगट

बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आर्या प्रोडक्शन व विराज शहा प्रस्तुत शिवछत्रपती राजा आणि माझ्या राजान भगवा फडकवला या दोन ऐतिहासिक गाण्यांचा प्रदर्शन सोहळा गुरुवार (दि. ११) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी गीताचे गीतकार व निर्माते शिक्षक नारायण गंगाधर गोरे ,क्लिक एन शूट चॅनलचे विराज शहा ,गायक स्वप्निल गायकवाड,नादच खुळा मंचचे शशिकांत कोठावळे, लावणी सम्राटनी मायाताई खुटेगावकर ,साहिल शहा ,किशोर टाव्हरे, आदित्य वळसे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवसापूर्वी या गीतांचा ट्रेलर रिलीज झाला असून या गीतांना सोशल मीडियावर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.या गीतांना विशाल मोहिते यांनी संगीत दिले असून रामानंद उगले व आकाश शिंदे यांनी गायन केले आहे. या गीताच्या माध्यमातून आतापर्यंतच्या वेगळ्या ऐतिहासिक ठेवा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असून यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्वलंत प्रेरणा आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा आशीर्वाद असल्याचे गीतकार व निर्माते नारायण गोरे यांनी सांगितले.

Previous articleबोगस आरटीआय कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यात घातले थैमान, माहिती अधिकार कायद्याला केले बदनाम
Next articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेखक अशोकराव टाव्हरे प्रकाशित करणार