बोगस आरटीआय कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यात घातले थैमान, माहिती अधिकार कायद्याला केले बदनाम

प्रमोद दांगट

तुम्ही बनावट कंपनीचे कपडे विक्री करता थांब तुझा कार्यक्रमच लावतो असे म्हणत पारगाव ( शिंगवे ) येथील कापड दुकानदाराला धमकी देऊन पाच हजार रुपये घेतल्याप्रकरणी दोन बोगस आरटीआय कार्यकर्त्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव येथील गहिनीनाथ रामभाऊ कापडी ( रा.पारगाव,आंबेगाव पुणे) यांच्या कापड दुकानात जानेवारी 2021 मध्ये शेवटच्या आठवड्यात दोन व्यक्ती कपडे खरेदी करण्यासाठी आले त्यांनी कापडी यांना बनियान व अंडरवेअर दाखविण्यासाठी सांगितले असता कापडी यांनी त्यांना अंडरवियर बनियान दाखविले त्यावेळी त्यातील केस वाढलेले व मिशी नसलेले व्यक्तीने कापडी यांना मी हरीश महादू कानसकर रा.रांजनी आरटीआय कार्यकर्ता व विशेष पोलीस अधिकारी आहे तसेच त्यांच्या बरोबर असलेला दुसरा व्यक्ती म्हणाला की मी नवनाथ बन्सी थोरात रा.रांजनी मी देखील आरटीआय कार्यकर्ता आहे तुम्ही बनावट कंपनीच्या विक्री करता मी तुमची तक्रार कॉपीराइट अधिकारी पुणे यांच्याकडे करणार असून तुमचा कार्यक्रमच लावतो अशी धमकी देत त्या दोघांनी कापडी यांच्याकडून पाच हजार रुपये घेऊन गेले असल्याचे कापडी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान त्या नंतर कापडी हे मुंबई येथे गेले होते. मुंबई वरून ते पुन्हा आपल्या गावी आले असता त्यांनी त्या दोघांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

दरम्यान तथाकथित सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या हरीश कानसकर वर काही दिवसापूर्वी दारू विक्री ,खंडणी मागणे ,धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असून तो अद्यापही फरार आहे.

Previous articleलोणीकंद येथील सचिन शिंदेने केला सचिन शिंदेचा खून. या प्रकरणातील 3 जण पोलिसांच्या जाळ्यात
Next articleबालगंधर्व रंगमंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन ऐतिहासिक गीताचे प्रदर्शन संपन्न