लोणीकंद येथील सचिन शिंदेने केला सचिन शिंदेचा खून. या प्रकरणातील 3 जण पोलिसांच्या जाळ्यात

लोणीकंद पोलिसांनी 48 तासांत गुन्ह्याची केली उकल.

वाघोली – पुणे नगर महामार्गालगत लोणीकंद येथे एच. डी. एफ. सी.ए.टी.एम समोर सचिन नानासाहेब शिंदे हा त्यांच्या सहकार्यासह उभे राहून गप्पा मारीत असताना अचानक एका अनोळखी इसमाने पिस्तूलातून सचिन नानासाहेब शिंदे यांच्या पाठीमागून येवून सचिन शिंदे च्या डोक्याच्या मागील बाजूस गोळीबार करून जिवे ठार मारून भगवा रंगाची स्कूटर चालविणाऱ्या इसमाच्या मदतीने स्कुटरवर पाठीमागे बसून पुणे अहमदनगर रोडने पेरणे गावचे दिशेने पळून गेले आहेत.अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याची घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या गुन्हाचे गांभीर्य ओळखत वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस व पुणे ग्रामीण पथक यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून गुन्ह्यातील आरोपींची गोपनीय बातमीच्या आधारे माहिती मिळवून सदर गुन्ह्यात आरोपी नामे सचिन किसन शिंदे (वय 32 वर्षे,), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20 वर्षे ), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20 वर्षे) रा लोणीकंद यांना अटक करण्यात आले आहे. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून सदरचा गुन्हा त्यांनी आणखी साथीदारांचे मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कामगिरी कोल्हापूर परिक्षेञाचे
विशेष पोलीस महानिरीक्षक, मनोजकुमार लोहिया,पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डाॕ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, हवेली विभाग उपविभागीय अधिकारी डाॕ.सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट,लोणिकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, सहा.पोलीस निरीक्षक नितीन अतकरे,बाळासाहेब गाडेकर, श्रीमंत होनमाने,दत्ता काळे,नाथा जगताप,उमेश गायकवाड, संतोष मारकड, योगेश भंडारे, अमोल गायकवाड, राजीव शिंदे तसेच पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,शिवाजी ननावरे,राम धोंडगे, सहा.फौजदार दत्ता गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे, अक्षय नवले यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास हवेली उपविभागीय अधिकारी डाॕ.सई भोरे पाटील, या करीत आहेत

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी कोणतीही बंधने नकोत
Next articleबोगस आरटीआय कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यात घातले थैमान, माहिती अधिकार कायद्याला केले बदनाम