छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी कोणतीही बंधने नकोत

वाघोली-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021 साजरी करताना कुठलेही नियम व अटी चे बंधन न घालता उत्साहात साजरी करण्याची परवानगी मिळवी यासाठी भाजपच्या वतीने लोणिंकद पोलिसांना निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना म्हणजेच लग्न, उद्घाटन समारंभ ,सरकारी कार्यक्रम, सर्व छोटे मोठे व्यवसाय कुठलेही नियम व अटी चे पालन न करता पूर्वपदावर चालू आहेत असे असताना फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना नियम व अटी ची बंधन का ? असा सवाल भाजपच्या वतीने उपस्थित करत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्याची बिनशर्त परवानगी देण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व हवेली तालुका भाजपच्या वतीने विनंती करत निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य गणेश बापू कुटे, युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप आबा सातव, लोणीकंद ग्रामपंचायत माजी उपसरपंच रवींद्र कंद, हवेली तालुका युवा मोर्चा सरचिटणीस गौरव झुरुगे आदी भाजप कार्यकर्ते होते.

Previous articleनिरवाडी (बु ) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सरपंचपदी अनिल वांढेकर तर उपसरपंचपदी सागरबाई किरळकर यांची बिनविरोध निवड
Next articleलोणीकंद येथील सचिन शिंदेने केला सचिन शिंदेचा खून. या प्रकरणातील 3 जण पोलिसांच्या जाळ्यात