निरवाडी (बु ) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा; सरपंचपदी अनिल वांढेकर तर उपसरपंचपदी सागरबाई किरळकर यांची बिनविरोध निवड

चारठाणा /प्रतिनिधी फोटो आहे (सेलू:) तालुक्यातील महादेवाची निरवाडी (बु) गावच्या सरपंचपदी अनिल वांढेकर यांची तर उपसरपंचपदी सागरबाई किरळकर यांची बिनविरोध निवड करण्यात गुरूवार (दि ११) रोजी पार पडली.

सेलू तालुक्यातील महादेवाची निरवाडी (बु)ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन समता पॅनेलचे निर्वीवाद वर्चस्व आहे. सरपंच व उपसरपंचपदाची निवडणुक बिनविरोध करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी बी.एस. माने यांनी सरपंचपदी अनिल वांढेकर यांची तर उपसरपंचपदी सागराबाई किरळकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी जाबेर देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रसंगी पॅनेल प्रमुख माजी उपसभापती विष्णू काळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश वांढेकर, गांधीजी किरळकर, गीताराम किरळकर, सर्जेराव काळे, रुस्तुम काळे, ओंकार वांढेकर ,दिनकर काळे,विलास शिंदे, बाबासाहेब शिंदे, बाळकृष्ण वांढेकर
आदी ग्रामस्थांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी उपसभापती विष्णू काळे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश वांढेकर,रुस्तुम काळे, ओंकार वांढेकर,गीतराम किरकर,विलास शिंदे,बाळकृष्ण वांढेकर,आनंदराव वांढेकर उपस्थित होते. चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल राऊत साहेब यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता

निरवाडी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल असुन विकास हेच ध्येय डोळयासमोर ठेऊन येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व सहकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या साथीने गावात पाणी, विज ,रस्ते ,नाली ,पांदण रस्ते या सह अदी विविध विकास कामे करून निरवाडी बु ग्रामपंचायतीचे नाव जिल्ह्यातील लोकीक करू असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच अनिल वांढेकर यांनी व्यक्त केला.

Previous articleपोखरी गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा
Next articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी कोणतीही बंधने नकोत