आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व

सिताराम काळे

– आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलचे सरपंच झाले असुन उपसरपंच पाच ग्रामपंचायतींवर झाले आहेत. तर शिवसेना पक्ष पुरस्कृत पॅनेलला उपसरपंच पद दोन ग्रामपंचायतीमध्ये मिळाले आहे. तर लांडेवाडी-पिंगळवाडी येथील सरपंचपद रिक्त राहिले आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोली को. व धोंडमाळ-शिंदेवाडी येथील सरपंच पद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलला सरपंच पद मिळाले असुन उपसरपंचपद शिवसेना पुरस्कृत पॅनेलला मिळाले आहे. तर कोलदरा-गोनवडी, कोळवाडी-कोटमदरा, काळेवाडी-दरेकरवाडी, गिरवली या गावांतील सरपंच व उपसरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेल विजयी झाले आहे. तर लांडेवाडी- पिंगळवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलची महिलेची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सरपंच व उपसरपंच यांची नावे व कंसात पुरस्कृत पॅनेलचे नाव – चिंचोली को. येथे सरपंचपदी विदया संजय कोकणे (राष्ट्रवादी) तर उपसरपंचपदी अरविंद शंकर दळे (शिवसेना), धोंडमाळ-शिंदेवाडी सरपंच सारिका संजय शिंदे (राष्ट्रवादी),उपसरपंच श्रीधर भिकाजी आवटे (शिवसेना), कोलदरा-गोनवडी सरपंच तेजस शिवाजी काळे, उपसरपंच सागर निवृत्ती केवाळे (दोन्ही राष्ट्रवादी), कोळवाडी-कोटमदरा सरपंच शुभांगी सुरेश काळे, उपसरपंच कल्पना भागुजी उगले. (दोन्ही राष्ट्रवादी), काळेवाडी-दरेकरवाडी सरपंच मंजुषा महेश बो-हाडे, उपसरपंच मंगल जैद (दोन्ही राष्ट्रवादी), गिरवली सरपंच पुजा अतुल सैद, उपसरपंच संतोष कोंडीभाउ सैद (दोन्ही राष्ट्रवादी), लांडेवाडी-पिंगळवाडी येथील सरपंच पद रिक्त असुन उपसरपंच श्रध्दा शंकर भवारी (राष्ट्रवादी) झालेल्या आहेत.

सरपंच व उपसरपंच निवडणुक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleभवरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन सातव तर उपसरपंचपदी वनिता साठे यांची बिनविरोध निवड
Next articleपोखरी गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा