भवरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन सातव तर उपसरपंचपदी वनिता साठे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

भवरापूर (ता.हवेली) ग्रामपंचायत सरपंचपदी सचिन सातव तर उपसरपंचपदी वनिता साठे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.मोरे यांनी दिली. सहाय्यक म्हणून ग्रामसेवक एस लोणकर यांनी काम पाहिले.

ग्रामपंचायत सदस्य संगीता गायकवाड, जानकुबाई सातव, निलेश गायकवाड, मुरलीधर साठे, दत्तात्रय सातव, रमेश गायकवाड, रवींद्र साठे, विलास साठे, संदीप साठे, संतोष सातव, गणेश सातव, लक्ष्मण सातव, संजय गायकवाड, महेश गायकवाड, सुनिल गायकवाड, हनुमंत साठे, सारिका साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाच्या असणाऱ्या सर्व योजना गावातील सर्व सामान्य नागरिकानं पर्यंत पोचविण्याचे काम करणार. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नवनिर्वाचित सरपंच सचिन सातव व उपसरपंच वनिता साठे यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल , भाऊसाहेब कांचन यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच यांचा सन्मान करण्यात आला.

Previous articleनायगावच्या सिद्धेश चौधरीने नॅशनल ज्युनियर अँथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले
Next articleआंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व