नायगावच्या सिद्धेश चौधरीने नॅशनल ज्युनियर अँथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले

Ad 1

उरुळी कांचन

      महाराष्ट्राच्या सिद्धेश चौधरीने नॅशनल ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. गुवाहाटीमध्ये ( आसाम ) ही स्पर्धा झाली. १८ वर्षांखालील मुलांच्या चारशे मीटर हर्डल्समध्ये पुण्याच्या सिद्धेश चौधरी आणि स्वयंम बधे यांच्यात जबरदस्त चुरस पहायला मिळाली, अखेरीस सिद्धेशने ५३.९१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावले, तर स्वयंमने ५३.९४ सेकंद वेळेसह रौप्य पदक मिळविले. राजस्थानच्या अंकितने ब्रांझ पदक मिळविले.

   सिद्धेश चौधरी हा मुळचा नायगाव ( ता. हवेली ) येथील असून सध्या तो बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे आईवडील दोघेही शेती करत असून घरची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. आईवडीलांनी शेतीमध्ये कष्ट करून त्याला शिक्षण व प्रशिक्षण देत आहेत.

महाराष्ट्राने या स्पर्धेत आठ सुवर्ण,  दहा रौप्य, अकरा ब्राॅन्झ अशी एकुण २९ पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर हरियाणा, दुस-या स्थानावर तामिळनाडू, तिस-या स्थानावर उत्तर प्रदेश, केरळ चौथ्या  स्थानावर आहे.