नगरसेवक विशाल भाऊ नायकवाडी यांनी स्वखर्चातून चाकण आंबेठाण रोडवर बसवले गतिरोधक

चाकण -आंबेठाण रोडचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्ता चांगला असल्यामुळे वाहने जोरात धावत आहेत त्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत गेल्या काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढले असून या रोडवरती अपघातामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

चाकण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक विशाल भाऊ नायकवडी यांनी आपले दायित्व म्हणून आपल्या स्वखर्चातून चाकण आंबेठाण रोड वरती गतिरोधक बसविण्याची निर्णय घेतला हे गतिरोधक बसवण्यासाठी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सभापती विनायक घुमटकर, नवनाथ शेठ होले ,चाकण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राम शेठ गो,रे युवा उद्योजक संजय शेठ गोरे, उद्योगपती राहुल शेठ नायकवडी तसेच जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेठ नायकवडी सक्सेस ग्रुपचे भरत शेठ कानपिळे आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleपवनानगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा उद्दोजक मेळावा
Next articleनायगावच्या सिद्धेश चौधरीने नॅशनल ज्युनियर अँथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले