देऊळगाव राजे येथे श्रीराम मंदिर निर्माण साठी निधी समर्पण अभियान

दिनेश पवार, दौंड

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण साठी देऊळगाव राजे येथून एकूण एक लाख वीस हजार रुपये निधी जमा झाला आहे, गावातील दुकानदार,छोटे मोठे व्यवसायिक,ग्रामस्थ यानी श्रद्धा पूर्वक हा निधी या मंदिर निर्माण अभियान साठी समर्पित केला.

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले,या शुभ दिनी मंदिराच्या कामास सुरुवात झाली,यासाठी निधी संकलन अभियान गावागावात सुरू आहे,लोक भक्तीभावाने देणगी स्वयंपूर्ण पणे देत आहेत,देऊळगाव राजे येथील काही दुकानदारांनी तर 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन हा दिवस पवित्र मानून यादिवशी जी कमाई झाली ती सर्व या कामासाठी दिली गेली या निधी संकलनासाठी ह.भ.प.गोरख महाराज पवार, शांतीलाल गिरमकर,देवेंद्र आवचर,आकाश मुंडलिक,भागवत सुर्यवंशी,यशवंत वाघमोरे यांनी सहभाग घेतला तर अजिंक्य सावंत यांनी यासाठी मार्गदर्शन केले

Previous articleपेठ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुरज चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा चौधरी
Next articleपवनानगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा उद्दोजक मेळावा