पेठ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुरज चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा चौधरी

उरुळी कांचन

पेठ (ता.हवेली) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुरज चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत खाडे व ग्रामविकास अधिकारी उज्वला हिंगणे यांनी सांगितले. सर्व साधारण प्रवर्गासाठी खुल्या असणाऱ्या सरपंच पदाच्या जागेसाठी व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी खाडे यांनी सरपंचपदी सुरज चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा चौधरी यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी चेअरमन सोमनाथ चौधरी, माजी आदर्श सरपंच महादेव चौधरी, रघुनाथ चौधरी, रामदास चौधरी, युवा नेते सुजित चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेंद्र आढाव, गोपीचंद चौधरी, केशव चौधरी, बाबुराव गायकवाड, दादा चौधरी, सर्जेराव चौधरी, लक्ष्मी शेलार, दत्तात्रय चौधरी, भालचंद्र चौधरी सह ग्रामपंचायत सदस्य, महिला, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव ते खोडद एस टी बस वेळा पत्रका नुसार सोडत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक हैराण
Next articleदेऊळगाव राजे येथे श्रीराम मंदिर निर्माण साठी निधी समर्पण अभियान