घोडेगाव- संगणकीकृत सात बारा मधील चुका दुरूस्त शिबिर संपन्न

Ad 1

सिताराम काळे

– घोडेगाव (ता. आंबेगाव) परीसरातील शेतक-यांना ऑनलाईन सात बा-याची प्रत काढल्यानंतर त्यातील चूकांमुळे धावपळ करावी लागत आहे. यासाठी मंडलस्तरावर गुरूवारी (दि. ११) घोडेगाव मंडलकार्यालयात संगणकीकृत सात बारा मधील चुका दुरूस्त करण्याचे शिबिर संपन्न झाले.

घोडेगाव मंडलकार्याल अंतर्गत येणारे आमोंडी, नारोडी, चास, गंगापुर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, शिनोली व घोडेगाव या सात गावांतील शेतकरी संगणकीकृत सात बारा दुरूस्ती करण्यासाठी मंडलकार्यालयात आले होते. यावेळी दुरूस्तीसाठी नविन अर्ज स्विकारले जात होते. जुन्या हस्तलिखित अभिलेखावरून खात्री करून तलाठी व मंडलाधिकारी शेतक-यांचे जबाब घेत लगेच कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव सादर करत होते. दुरूस्ती बाबत आदेश प्राप्त होताच संगणकीकृत सात बारा दुरूस्ती गावकामगार तलाठी यांच्याकडून केली जाणार आहे. यावेळी मंडलाधिकारी योगेश पाडळे, तलाठी दिपक हरण उपस्थित होते.