राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आण्णासाहेब महाडिक यांच्या पत्नी शिंदवणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनिषा महाडिक तर उपसरपंचपदी सारिका महाडिक

उरुळी कांचन

शिदंवणे (ता.हवेली) गावात महिलाराज राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे आण्णा महाडिक याच्या पत्नी सरपंचपदी मनिषा आण्णा महाडिक तर कै.जर्नादन बापू महाडिक याच्या सूनबाई उपसरपंचपदी सारिका दिनानाथ महाडिक बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय आधिकारी ए. एस. सराफ तर सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी डी. आर. पोटे यांनी काम पाहिले.
माजी सरपंच आण्णा महाडिक तसेच त्यांचे बंधू माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी खुप मोठ्या प्रमाणावर निधी आणला. अनेक सामाजिक विधायक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले म्हणूनच नागरिकांनीही मोठ्या विश्वासाने आण्णा महाडिक यांच्या गटाकडे बहुमताने सत्ता दिली असे मत माजी सरपंच गणेश महाडिक यांनी सांगितले.

याप्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक, माजी सरपंच आण्णासाहेब महाडिक, तंटामुक्तीचे अध्यक्ष भुजंग महाडिक, युवराज महाडिक, नाना सुदाम महाडिक, गोकुळ महाडिक, संजय डोंबाळे, सोमनाथ चव्हाण, आनंद शितोळे, भिमराव शितोळे, बिटू शितोळे, बन्सीआबा महाडिक, कांतीलाल महाडिक, दत्तात्रय महाडिक, भाऊसाहेब महाडिक, पोपट महाडिक, उद्धव महाडिक, दिनानाथ महाडिक, व्यंकट महाडिक, रामभाऊ महाडिक, सुरेश कांचन, कांतिलाल महाडिक आदी उपस्थित होते.

शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे , शिरुरचे आमदार अशोक पवार तसेच माजी सरपंच आण्णासाहेब महाडिक, जिल्हा परिषद पुणे – पंचायत समिती हवेली यांच्या माध्यमातून गावातील विकास कामासाठी प्राधान्य देण्यात येणार. शासकीय योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे नवनिर्वाचित सरपंच मनिषा महाडिक व उपसरपंच सारिका महाडिक यांनी सांगितले

Previous articleकोलवडी – साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नमाला राजेंद्र मदने यांची बिनविरोध निवड
Next articleघोडेगाव- संगणकीकृत सात बारा मधील चुका दुरूस्त शिबिर संपन्न